परळी / वार्ताहर :
Leopard calf injured in Sajjangarh mountains सज्जनगडावर बिबट्याचा बछडा सापडलेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री 8 च्या दरम्यान सज्जनगडच्या डोंगरात बळीपवाडीच्या वरच्या बाजूला बिबट्याचा छोटा बछडा जखमी अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाचे वनपाल डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपरिमंडल अधिकारी अरुण सोळंकी, वनरक्षक साधना राठोड यांनी घटनास्थळी जाऊन बछड्याची पाहणी केली. यावेळी बछड्याच्या शेपटीला जखम झाली होती.
ग्रामस्थांनी या परिसरात दोन बछडे फिरत असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. मात्र, हा बछडा तिथेच सोडून येण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी शिरवळ येथील दवाखाण्यात दाखल केल्याची माहिती वनपाल निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
अधिक वाचा : ‘शाओमी’चा 5551 कोटींचा निधी ईडी गोठवणार