वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) निव्वळ संपत्ती मूल्य हे 31 मार्च 2022 पर्यंत वाढून 5,41,492 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मार्च 2021 मध्ये हा आकडा 95,605 कोटी रुपये होता, अशी माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये एलआयसीचा हा आकडा 5,39,686 कोटी रुपये होता.
31 मार्च 2022 अखेर वर्षात नव्या व्यवसायाचे मूल्य 7 हजार 619 कोटी रुपयांवर राहिले होते जे 31 मार्च 2021 अखेर 4 हजार 167 कोटी रुपये इतके होते. 30 सप्टेंबर 2021 ला संपलेल्या सहा महिन्यात हे मूल्य 1 हजार 583 कोटी रुपये इतके होते. यादरम्यान वैयक्तिक व्यवसाय व समूह व्यवसाय हा 31 मार्च 2022 अखेर 35 हजार 572 कोटी, 14 हजार 818 कोटी रुपये इतका अनुक्रमे राहिला होता. याचाच अर्थ वैयक्तिक व्यवसायाचा वाटा जवळपास 70 टक्के इतका राहिला असल्याचे दिसले आहे.