ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाकडून पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने यासंबधीची अधिसूचना जारी केली आहे.
एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ‘मोदी चोर है’ या शब्दांचा वापर केला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भाजप नेते पुर्णेश मोदी यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि खासदारकी गमवावी लागली होती. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली आहे. त्यामुळे राहुल गांधींसह काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. उद्या लोकसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court on Friday (August 4) stayed his conviction in the ‘Modi’ surname remark case.
He was disqualified from the lower house in March 2023. pic.twitter.com/UBE3FvCGEN
— ANI (@ANI) August 7, 2023