भर पहाटे गॅस सिलिंडरचा विस्फोट होऊन चौघे जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना बेळगाव शहराच्या गांधीनगर येथील सुभाष गल्लीत घडली आहे.
केएसआरटीसीमध्ये सेवारत असलेले मंजुनाथ अथणी नेहमी प्रमाणे आज सकाळी ड्युटीवर जाण्याआधी चहा बनविण्याकरीता गॅस स्टोव्ह ऑन करून लाईटर पेटवताच गॅस भडकून विस्फोट झाल्याची माहिती समोर आली
आहे. या घटनेत परिवारातील एकूण चौघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. या घटनेची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात झाली आहे.