पारोडा : घुडो, अवेडे-केपे येथील श्री शांतादुर्गा चामुंडेश्वरी (कुडतरी महामाया) संस्थानातील वार्षिक फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ते अमावस्यापर्यंतचे महारूद्र अनुष्ठान आज सोमवार दि. 20 व मंगळवार दि. 21 रोजी पुढील कार्यक्रमांनिशी होणार आहे. आज सोमवारी सकाळी 9.30 वा. गणेशपूजन, देवता प्रार्थना, पुण्याहवाचन आचार्यवर्ण, महारुद्र आरंभ, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, अन्नसंतर्पण आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी अमावास्या उत्सव, अनुष्ठान समाप्ती, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद, अन्नसंतर्पण व आशीर्वाचन, रात्री आरती, श्रींची पालखीतून मिरवणूक, तीर्थप्रसाद, अन्नप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून श्रींंच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संस्थान समितीने केले आहे. दरम्यान, बुधवार दि. 22 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सकाळी 10.45 वा. संस्थानच्या पाचव्या इमारतीची पायाभरणी होणार आहे.
Previous Articleसरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध
Next Article नटवर्य पणशीकरांमुळे पेडणेचे नाव अजरामर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.