आमदार प्रवीण आर्लेकर : पेडणे येथे नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव उत्साहात
पेडणे : नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी पेडणे तालुक्मयाचे नाव नाट्या क्षेत्रामध्ये देशात अजरामर केलं. अशा या गुणी कलाकाराच्या नावे पेडणे तालुक्मयामध्ये कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या रवींद्र कला भवन या प्रकल्पातील सभागृहाला नटवर्य प्रभाकर पणशीकर यांचे नाव देण्याबाबत पेडणेकरांसह आपलीही इच्छा आहे. याद्वारे त्यांच्या स्मृती कायम आमच्या स्मरणात राहतील. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात येथील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी पेडणे तालुक्मयामध्ये सुसज्ज असे रवींद्र भवन उभारण्यात येणार, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार व गोवा हस्तकला व लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी केले. नटवर्य प्रभाकर पणशीकर कलामंच आणि गोवा मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नटवर्य प्रभाकर पणशीकर कला मंच आणि गोवा मराठी अकादमी आयोजित नटवर्य प्रभाकर स्मृती महोत्सव शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जान्हवी पणशीकर, आमदार प्रवीण आर्लेकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जानवी पणशीकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, पणशीकरांच्या कन्या तारिगिणी खोत, पेडणे नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई, श्री भगवती रवळनाथ देवस्थान अध्यक्ष आदित्य देशप्रभू, प्रवीण कोटकर, गोवा मराठी अकादमीचे पेडणे प्रमुख चंद्रकांत सांगळे आदी उपस्थित होते. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत म्हणाले की, प्रभाकर पणशीकर सारखे नटवर्य होण्यासाठी त्यांचे चरित्र अभ्यासण्याची गरज आहे. त्यांनी नाट्या क्षेत्राला जे वैभव प्राप्त करून दिले त्याला तोड नाही. नटवर्य प्रभाकर पणशीकर हे एक विद्यापीठ होते आणि त्यामुळे त्या विद्यापीठात अनेक कलाकार घडले. युवा कलाकारांनी अशा या थोर नटवर्याचे गुण आत्मसात करून नाट्याकलेला उभारी द्यावी आणि आपलेही नाव नाट्याक्षेत्रात उज्ज्वल करावे, असे प्रा. अनिल सामंत म्हणाले.
समस्त गोमंतकीयांचे आदर्शवत व्यक्तिमत्व!
प्रभाकर पणशीकर यांच्या सुकन्या तारिंगिणी खोत म्हणाल्या की, नटवर्य प्रभाकर पणशीकर हे जरी आमचे वडील असले तरीसुद्धा ते समस्त गोमंतकीय जनतेचे आदर्शवत असे व्यक्तिमत्व होते. पंतांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेल्या वषी प्रभाकर पणशीकर नाट्या महोत्सव आणि यंदा त्याचे रूपांतर कलामंचामध्ये करून स्मृती महोत्सवाचे आयोजन पेडणे तालुक्मयामध्ये केलेले आहे. या स्मृती महोत्सवातून प्रभाकर पणशीकर यांच्या स्मृती कायम चिरंतर राहतील आणि अशा या महोत्सवासाठी आमचे नेहमीच सहकार्य असेल, असे तारांगिणी खोत म्हणाल्या सुऊवातीला श्र्रद्धा जोशी यांनी गणेश वंदना सादर केली. यावेळी सन 2022 मध्ये विविध नाट्या स्पर्धांमधून यश प्राप्त केलेल्या नाट्या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव होणार आहे. यात ओम कला सांस्कृतिक केंद्र, हळर्ण, सातेरी कला मंदिर हसापूर, पेडणे, श्री रवळनाथ युनिटी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब, तळर्ण, रसरंग संस्था उगवे, पेडणे, श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघ वारखंड, पेडणे, सान्वी कला मंच, मांद्रे, पेडणे अभिनव कला थिएटर मांद्रे, पेडणे यांचा आमदार प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वागत व प्रास्तविक विठ्ठल प्रभुदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत मांद्रेकर यांनी केले. तर आनंद नाईक यांनी आभार मानले. यावेळी व्हायकाऊंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, नाट्याकर्मी प्रेमनाथ धारगळकर, ज्येष्ठ नाट्याकर्मी विठ्ठल उर्फ काका प्रभू देसाई, नाट्या रसिक आनंद नाईक, कौशल्य पेडणेकर, भगवान शेटकर उदय गुरव यांनी सहकार्य केले. उद्घाटन सत्रानंतर सायंकाळी ठीक साडेसात वाजता सातेरी कला मंदिर हसापूर पेडणे या संस्थेच्यावतीने दोन अंकी सामाजिक नाटक कला अकादमी आयोजित ‘अ’ गट नाट्या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक विजेते नाटक ‘हॅण्डस अप’ हे सादर करण्यात आले.
‘नाट्याप्रभा’ कार्यक्रमासह ‘रणांगण’ नाट्याप्रयोग रंगला
रविवार दि. 19 मार्च रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता नाट्याप्रभा हा एक सांगितिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना विघ्नेश जोशी यांची होती. त्यात सहभाग रघुनंदन पणशीकर, जान्हवी पणशीकर, देविका पणशीकर यांचा होता. सायं. 7.30 वाजता श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघ वारखंड पेडणे प्रस्तुत दोन अंकी ऐतिहासिक नाटक, राजीव गांधी कला मंदिर फोंडा यांनी आयोजित केलेल्या ऐतिहासिक नाट्या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते नाटक ‘रणांगण’ हे सादर करण्यात आले.