विविध जातींच्या आंब्यांचे आकर्षण : थेट शेतकऱयांकडून विक्री : हय़ूम पार्कमध्ये आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्यांची विक्री करता यावी याकरिता बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभागातर्फे गुरुवार दि. 26 ते 29 मे दरम्यान आंबा महोत्सव भरविला जाणार आहे. विशेषतः आंबा महोत्सवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड, मालवण येथील हापूस, पायरी उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यामुळे बेळगावकरांना कोकणातील हापूस आणि पायरी आंब्यांची चव चाखता येणार आहे. क्लब रोड येथील हय़ूम पार्कमध्ये हा आंबा महोत्सव होणार आहे.
शेतकऱयांना थेट ग्राहकांशी जोडून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या आंबा महोत्सवामध्ये देवगड, रत्नागिरी, पायरी, बिटक्मया यासह 25 प्रजातींचा आंबा दाखल होणार आहे. यामध्ये कोकण सम्राट, रत्ना बारमासी, दशेहरी, दूधपेढा, गोवा माणखूर, तोतापुरी, ऑस्टीन, लीली, नीलम, रत्ना, शुगर फ्री अशा 25 प्रजातींचा आंबा दाखल होणार आहे. त्यामुळे आंबे खवय्यांना एकाच छताखाली विविध जातींचे आंबे खरेदी करता येणार आहेत.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे आंबा महोत्सव थांबला होता. मात्र, यंदा पुन्हा आंबा महोत्सव भरविला जात आहे. 2018 च्या आंबा महोत्सवात 70 टन तर 2019 च्या आंबा महोत्सवात 97 टन आंब्यांची विक्री झाली होती. त्यामुळे यंदाच्या आंबा महोत्सवातदेखील आंब्यांची अधिक विक्री होईल, अशी अपेक्षा खात्याने ठेवली आहे.
आंबाप्रेमींना आवाहन
मँगो बोर्डच्या अनुदानाअभावी आंबा महोत्सव लांबणीवर पडला होता. मात्र, आता कोल्हापूर येथील पणन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंबा महोत्सव भरविला जाणार आहे. या महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. आंबा प्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)