विनोद सावंत, कोल्हापूर
Kolhapur News : कर बुडव्या मिळकधारकांचा पर्दापाश करण्यासाठी मनपाने मागील महिन्यांपासून रिव्हीजन (मिळकतींची फेरतपासणी) सुरू केली आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी लेबर ऑफिसकडे याकामासाठी 120 कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत एकही कर्मचारी दिलेला नाही. शहरात दीड लाख मिळकतींची तपासणी करायची आहे.घरफाळा विभागातील कर्मचाऱ्याच्या जोरावर हे शक्य नाही. या कामासाठी स्वतंत्र टिम नेमावी लागणार आहे.रिव्हीजननंतर मनपाचे उत्पन्न वाढणार आहे.असे असतानाही रिव्हीजनसाठी प्रशासन मॅनपॉवर देण्यात टाळाटाळ करते, हे दुर्देवी आहे.
गेल्या 20 वर्षापासून शहरातील मिळकतींचे रिव्हीजन झाले नसल्यामुळे घरफाळ्याच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही.अनेकांनी टोलेजंग इमारती उभारल्यात परंतू घरफाळा लागू करून घेतलेला नाहीत.तर काहींनी कुळ वापर असताना मालक वापर म्हणून नोंद केली आहे.20 वर्षात अनेकांनी वाढीव बांधकाम केले परंतू त्याची नोंद घरफाळा विभागाकडे केलेली नाही.दरवर्षी महापालिका यासंदर्भात नोटीस काढून संबंधितांना घरफाळा नोंद करण्याचे आवाहन करते.मात्र, मिळकतधारक घरफाळा वाढेल या भितेन मनपाकडे फिरकत नाहीत.यामुळे मनपाचे उत्पन्न बुडत आहे.यामुळे विकासकामावर परिणाम होत आहे.मनपाने तीन वर्षापूर्वी एका खासगी कंपनीला शहरातील मिळकतींचा रिव्हीजन करण्याची जबाबदारी दिली होती.त्या कंपनीने निम्म्यातच पळ काढला.त्यांना दिलेले लाखो रूपये बुडाले.या सर्वाचा विचार करून महापालिकेने आता स्वत:ची यंत्रणा वापरून 7 जुनपासून शहरातील मिळकतींचा रिव्हीजन सुरू केली आहे.
दरम्यान,लेबर विभागाकडे या कामांसाठी 120 कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.परंतु कर्मचारी दिले नसल्याने घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांकडून रिव्हीजनचे काम सुरू केले आहे.सकाळ सत्रात सर्व्हे आणि दुपारनंतर कार्यालयीन कामकाज केले जात आहे.त्यामुळे रिव्हीजनचे काम गतीने होताना दिसून येत नाही.केवळ रिव्हीजनसाठीच स्वतंत्र मॅनपॉवरची गरज आहे.
दीड महिन्यांत एक हजारहून अधिक मिळकतींची तपासणी झाली आहे.यामध्ये 300 हून अधिक मिळकतींना घरफाळाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जर शहरातील सर्वच मिळकतींची तपासणी केली तर नक्कीच मनपाचे 15 कोटींने उत्पन्न वाढेल,असा अंदाज आहे.मात्र, घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांकडून शहरातील दीड लाख मिळकतींची तपासणी करणे शक्य नाही. मनपा प्रशासनाकडून या कामासाठी स्वतंत्र मॅनपॉवर दिली पाहिजे.
कर्मचाऱ्यांसाठी लेबरला स्मारणपत्र
प्रशासकांनी रिव्हीजनची फाईल मंजूर केल्यानंतर घरफाळा विभागाने 120 कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले होते.कर्मचारी दिले नसल्याने काम गतीने होत नाही,हे वास्तव आहे.त्यामुळे लेबर ऑफीसला काही दिवसांपूर्वी कर्मचारी मिळण्यासाठी पुन्हा स्मरणपत्र दिले आहे.
सुधाकर चल्लावाड, कर निर्धारक, महापालिका
तपासणी करणाऱ्या टिमवरही राहणार वॉच
रिव्हीजनमध्ये सेटलमेंटचा आरोप झाले.मात्र काम पारदर्शकच सुरू आहे.आतापर्यंत सुधारित एकही बील जनरेट केलेले नाही,त्यामुळे सेटलमेंटचा विषयच येत नाही.तसेच लेबर विभागाने 120 कर्मचारी दिल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांची एक टिम केली जाणार आहे.अशा दोन टिमवर वॉच ठेवण्यासाठी एक सहायक अधीक्षक किंवा वरीष्ठ लिपिक यांचे स्कॉड नेमणार आहे.टिमने रिव्हीजन केल्यानंतर त्यापैकी रेंडमली मिळकतींची क्रॉस चेक केले जाणार आहे.यामध्ये कमी घरफाळा लावला असल्यास संबंधितांवर कारवाई होणार असल्याची माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एकूण मिळकती -1 लाख 55 हजार
रहिवाशी- मिळकती-1 लाख 20 हजार
व्यावसायिक मिळकती -35 हजार
यापूर्वी केलेले रिव्हीजन -2003
रिव्हीजनला सुरवात-7 जुन 2023