Maratha Samaj Utkarsh Mandal Sawantwadi- Dodamarg in Shiv Jayanti spirit
मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी- दोडामार्गच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय शिवाजी जय भवानी ‘ छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय… जय ..जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी संजना परब, विनोद सावंत, बंटी पुरोहित, प्रविण मांजरेकर, दीनानाथ नाईक, सौ.राऊळ, नितीन सातपुते, समीर पालव,आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी