नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने रेल्वेमार्फत मागच्या आर्थिक वर्षामध्ये 2.33 लाख इतक्मया मोटारींचा पुरवठा केला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 23 टक्के इतकी वाढ पुरवठय़ामध्ये करण्यात आली आहे. आर्थिक 2020-21 मध्ये रेल्वेने 1.89 लाख मोटारींचा पुरवठा केला होता. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांच्या कालावधीत मारुती सुझुकी कंपनीने 11 लाख वाहनांचा पुरवठा केला आहे.