उपमहापौर, नगरसेवक, विभागप्रमुख राहणार उपस्थित
बेळगाव : महापौर शोभा सोमनाचे सोमवारी सकाळी 11 वाजता विकासकामांच्या चर्चेसाठी आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी उपमहापौर, नगरसेवक, विभागप्रमुख आणि अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. बैठक यशस्वी करण्यासाठी कौन्सिल विभागाने आवश्यक तयारी केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत मंगळवार दि. 6 रोजी आढावा बैठक होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी महापौरांनी बैठक आयोजित केली आहे. या आढावा बैठकीत शहरातील रस्ते, गटारी, पाणी, नाले आणि विकासकामांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.