वृत्तसंस्था/ डोहा
एटीपी टुरवरील शनिवारी झालेल्या कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने एकेरीचे जेतेपद मिळविताना ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मेदव्हेदेवने अँडी मरेवर 6-4, 6-4 अशी मात करत जेतेपद पटकाविले. मेदव्हेदेवने गेल्या आठवडय़ात रोटरडॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. सलग दोन आठवडय़ात मेदव्हेदेवने 2 स्पर्धा जिंकल्या असून त्याचे वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील हे अठरावे विजेतेपद आहे. 2019 नंतर मरेला अद्याप एटीपी टुरवरील स्पर्धा जिंकता आलेली नाही. मरेने आतापर्यंत एटीपी टूरवरील 46 स्पर्धा जिंकल्या आहेत.