दादासाहेब चव्हाण यांच्या आंदोलनाला यश
प्रतिनिधी/ दहिवडी
खटाव तालुक्यातील निढळ येथे मेघा इंजिनिअरिंग कंपनीने परवानाच्या नावाखाली बेकायदेशीर अवैध मुरूम व दगड उत्खनन केल्याप्रकरणी पंचनामे करून एकशे पाच कोटीचा दंड आकारण्यात आला होता.
मात्र महसूल प्रशासनाने वेळोवेळी दंड वसुलीसाठी मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नोटीस बजावण्यात आले होते. त्याकडे सदर कंपनीने कानाडोळा करत दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे कंपनी चे व्यवसाय खाते सील करण्यात आले. जिह्यामध्ये महसूल विभागाच्या कोटय़वधी रुपये रकमेचा भरणा न करणाया सातारा- म्हसवड रस्त्याचे बांधकाम कंत्राट असलेल्या, निकृष्ट दर्जाच्या व अनेक वर्ष बांधकाम प्रलंबित ठेवून, अनेकांच्या मृत्यूस अपघातास कारणीभूत ठरलेल्या… मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, तेलंगणा, हैदराबाद येथील कंपनीच्या विरोधात जिह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून, महसूल विभागाकडे भरणा करावयाची कोटय़वधी रुपयांची रक्कम मेघा इंजिनिअरिंग ने प्रलंबित ठेवली होती, प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या न्यायासनासमोर सुनावणी होऊन सुमारे 105 कोटी रुपयांचा दंड मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ला करण्यात आला.त्यांची वाहन देखील जप्त करण्याचा आदेश देण्यात आला.मात्र आपले आडेल तट्टू धोरण कायम ठेवत मेघा इंजिनिअरिंगन महसूल विभागाने ठरवलेला दंड न भरल्यामुळे तहसीलदार श्री किरण जमदाडे यांनी आपल्या अधिकारात सरकारच्या करांचा भरणा न करणाया मेघा कंपनीच्या हैदराबाद तेलंगणा राज्यातील ’युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या बालानगर हैदराबाद येथील खाते सील केले.गेले अनेक वर्ष मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जिह्यामधल्या या महत्त्वाच्या रस्त्याचे काम दिलेले आहे, मोठय़ा प्रमाणावर काम प्रलंबित असून जिल्हा वासियांमध्ये या प्रलंबित कामामुळे सतत घडणारे अपघात व होणारे मृत्यू यामुळे मोठा असंतोष आहे. या कंपनीसोबत काम करणाया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व शासनाच्या इतर विभागातील अधिकारी कर्मचायांमध्ये कंपनी विषयी मोठा रोष आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळे मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कामे विलंबाने केली तरी काहीही फरक पडत नाही,मात्र स्थानिक राजकारणी, जनता, पत्रकार यांच्या रोषाला अधिकारी कर्मचायांना बळी पडावे लागत असल्याने, दबक्या आवाजात मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? अशी चर्चा असते, मात्र महसूल अधिकायांनी घेतलेल्या या कडक भूमिकेचा जिल्हाभरातून स्वागत केले जात असून,महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे तरी मेघा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी वेळेत काम पूर्ण करेल अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते व ह्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आंदोलन करणारे दादासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्ष हे काम मिळूनही या रस्त्यावरील अनेक मोठे पूल आणि इतर कामांच्या बाबतीत कंत्राटदार कंपनीने अक्षम्य उशीर केलेला आहे. स्थानिक कंत्राटदारांकडून काम करून घेऊन त्यांचे पैसेही अदा केलेले नाही. अनेक वादात अडकलेल्या या कंपनीच्या धोरणांमुळे या रस्त्याचे प्रलंबित काम कधी पूर्ण होणार? असा सवाल जिह्यातील जनतेच्या मनात कायम आहे, महसूल विभागाने कुठल्याही दबावाला बळी न पडता केलेल्या या कारवाईचा सर्वसामान्यांकडून स्वागत केलं जात आहे