वेंगुर्ले (वार्ताहर)-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १० जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनानिमीत्त वेंगुर्ले तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी देण्या बाबत ठरविण्यात आले. वेंगुर्ले तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक मिळालेला १० बी, १२ वी च्या गुणवंत विद्यार्थीचा गौरव करणे तसेच पक्षाच्यावतीने त्या त्या वेळी देण्यात येणारे उपक्रम तालुक्यात व शहरात राबविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत ठरविण्यात आले.वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण व शहर कार्यकारीणीची एकत्रित बैठक हॉस्पीटल नाका वेंगुर्ले येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यालयात तालुका अध्यक्ष योगेश कुबल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या सुरवातीस नवनियुक्त तालुका अध्यक्ष योगेश कुबल यांचे अभिनंदन करण्यांत आले.
यावेळी सभेस उपस्थित पदाधिकाऱ्यांत महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल, जिल्हा बैंक संचालिका प्रज्ञा परब, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, तालुका महिला अध्यक्षा दिपिका राणे, माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, वैभव वाडकर, शहर सचिव स्वप्नील रावळ, बाबतीस डिसोजा, सुप्रिया परब, भिवा (कुणाल) बिडये, अपूर्वा परब, प्रदीप पडवळ, विशाल बागायतकर, रामेश्वरी गवंडे, राजू गवंडे आदींचा सह कार्यकर्ते उपस्थित होते.