वर्षातील 30 दिवस कडाडते वीज
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशातील मॅराकाइबो सरोवर जगातील सर्वात जुन्या सरोवरांपैकी एक आहे. हे सरोवर बहुधा 35 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झालेले असावे. सर्वसाधारण सरोवरांच्या तुलनेत आकाराने खूपच मोठे आहे. लाखो वर्षांमध्ये यातील पाणी आणि तळ अनेकवेळा बदलांना सामोरे गेले असेल असे वेज्ञानिकांचे मानणे आहे. या सरोवराच्या ठिकाणी सर्वाधिक वेळा वीज कडाडत असते. यामागील कारण कुणालाच शोधून काढता आलेले नाही.
अमेरिकन मेटेरोलॉजिकल सोसायटीने नोव्हेंबर 2016 मध्ये यासंबंधी अध्ययन केले होते. मॅराकाइबो सरोवरात वर्षातील सुमारे 297 दिवसांपर्यंत वीज कडाडत असते. तसेच दर मिनिटाला सुमारे 25 ते 40 वेळा वीज कडाडते. हा प्रकाश इतका मोटा असतो की, स्थानिक लोकांना रात्रीच्यावेळी लिहिणे-वाचणे ही कामे देखील या प्रकाशात करता येतात.
मॅराकाइबोपूवीं आफ्रिकेतील कांगो बेसिनच्या नावावर हा विक्रम होता. ज्गातील अनेक पर्वतीय अन् जलयुक्त ठिकाणांविषयी अनेक देशांनी दावे केले, परंतु अखेरीस वीज चमकण्याप्रकरणी व्हेनेझुएलाच्या सरोवराची सर कुणीच करू शकत नसल्याचे मानले गेले.
स्थानिकांमध्ये होती भीती
सर्वप्रथम 16 व्या शतकात स्पॅनिश पर्यटक अमेरिको वेस्पकी यांनी या ठिकाणाचा शोध लावला होता. परंतु स्थानिक लोक देखील या ठिकाणाबद्दल जाणून होते. परंतु भीतीमुळे तेथे कुणीच राहत नव्हते. हा निसर्गाचा चमत्कार नव्हे तर यामागे भूत-प्रेत यासारख्या गोष्टींचा हा असल्याचे ते मानत होते. सुमारे 300 वर्षांनी येथे लोकांनी राहण्यास सुरुवात केली. पूर्वी ज्या सरोवराला पाहून लोक घाबरत होते, तेच आता त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन ठरले आहे.
पर्यटनात वाढ
अजब दृश्य पाहण्याचे शौकीन पर्यटक येथे वीज चमकण्याचे प्रसंग पाहण्यासाठी येत असतात. याला लाइटनिंग टूरिझम म्हटले जाते. पर्यटक सप्टेंबरपासून नोव्हेंबरदरम्यान येतात. तेव्हा वीज पूर्ण दिवस कडाडत असते. हे पर्यटक सरोवराच्या काठावर निर्माण करण्यात आलेल्या छोट्या-छोट्या घरांमध्ये राहतात. वीज कडाडण्याच्या प्रसंगी पर्यटकांना विशेष खबरदारी घ्यावी लागते. तर या सरोवरात मासेमारी करणारे मच्छिमार या विजेच्या तडाख्यात सापडून स्वत:चा जीव गमावत असतात.
कारण काय?
वीज चमकण्याचे प्रमाण अत्यंत अधिक असण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगण्यात येते. वर्षभर वीज कडाडण्यामागे आद्र्र्रता, तापमान आणि भौगोलिक स्थान कारणीभूत असल्याचे काही वैज्ञानिकांचे मानणे आहे. सरोवरच्या दक्षिण बाजूला अँडीज पर्वत तर उत्तरेस कॅरेबियन समुद्र आहे. पर्वतांवरून येणारे थंड वारे समुद्राकडून येणाऱ्या उष्ण अन् आर्द्रतायुक्त वाऱ्यांना भिडतात, वीज कडाडण्यासाठी ही आदर्श स्थिती असल्याचे मानले जाते. अनेक वैज्ञानिक ही थिअरी नाकारतात.