कॅनबेरा-ऑस्ट्रेलिया / वृत्तसंस्था
अष्टपैलू मिशेल मार्श गुडघ्याच्या दुखापतीमुळे झिम्बाब्वे व न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया वनडे मालिकेतून बाहेर फेकला गेला असून हा ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठा धक्का ठरला. मिशेल मार्शला यापूर्वी टाऊन्सव्हिलेमधील मागील लढतीत वेदना जाणवल्या. मंगळवारी त्याच्या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले. तो आता पर्थमध्ये आपल्या घरी रवाना होईल. मार्शच्या जागी आता यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसला पाचारण करण्यात आले आहे. इंग्लिस सध्या लंडन स्पिरिट संघातर्फे द हंड्रेड स्पर्धेत खेळत होता. मिशेल मार्श भारताविरुद्ध दि. 21 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱया पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत पुनरागमन करेल, अशी आशा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली.