रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
वार्ताहर /धामणे
नंदिहळ्ळी ते गर्लगुंजी 3 किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी या रस्त्याचा काही भाग मुसळधार पावसाने वाहून गेला होता. त्यामुळे मागील 6 महिने वाहनधारकांना नंदिहळ्ळीहून राजहंसगडामार्गे गर्लगुंजीला जाण्यासाठी 5 किमी लांबपल्ला तोडून जावे लागत होते. परंतु नंदिहळ्ळी ग्रा. पंचायतने वाहून गेलेल्या रस्त्यावर मुरूम, भर घालून वाहनधारकांना दिलासा दिला होता. परंतु घालण्यात आलेला भराव वाहून गेल्यास यंदाच्या पावसाळ्यात येरे माझ्या मागल्यासारखी पिरिस्थिती निर्माण होण्याची भीती नंदिहळ्ळी, गर्लगुंजी या भागातील वाहनधारकांना वाटत आहे. त्रासदायक होणार असल्याने तसा प्रसंग येवू नये, यासाठी या भागाच्या लोकप्रतिनिधीनी तातडीने या रस्त्याच्या कामाची सुरुवात करून या भागातील वाहनधारकांचे होणारे हाल दूर करावेत, अशी मागणी नंदिहळ्ळी, गर्लगुंजी येथील नागरिकांतून आता जोर धरू लागली आहे.