वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पीव्हीआर-आयनॉक्स यांच्या विलीनीकरण प्रक्रियेला अखेर एनसीएलटीने मान्यता दिली असल्याची माहिती आहे. यासंदर्भातला लेखी आदेश पुढील 15 ते 20 दिवसात काढला जाणार असल्याचे समजते.
27 मार्च रोजी पीव्हीआर आणि आयनॉक्स यांच्यात विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया टप्यटप्याने सुरु होती. यासंदर्भात नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनलकडे प्रकरण होते अखेर त्यांनी या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता विलीनीकरण प्रक्रिया वेगाने पुर्णत्वाला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच आर्थिक वर्षात सदरचे विलीनीकरण पूर्ण होईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.