झुरिच / वृत्तसंस्था
भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा आज होणाऱया प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अंतिम स्पर्धेत जेतेपदाच्या शर्यतीत असणार आहे. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स येथे दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. नीरजला ऑलिम्पिक रौप्यजेत्या जकूब व्हॅडलेचचे मुख्य आव्हान असेल. चोप्राने यापूर्वी लुसाने येथे झालेल्या डायमंड लीग सिरीज इव्हेंटमध्ये जेतेपद मिळवत जोरदार पुनरागमन केले होते. तो डायमंड लीग टायटल मिळवणारा पहिला भारतीयही ठरला. त्यानंतर बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत धोंडशिरेच्या दुखापतीमुळे त्याला सहभागी होता आले नव्हते. 24 वर्षीय नीरज नंतर लुसाने येथे दि. 26 जुलैला झालेल्या सिरीजमध्ये विजयी ठरला. डायमंड लीगमध्ये एकूण 32 क्रीडा प्रकारांचा समावेश असतो.