|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आणीबाणी

वणव्यामुळे ऑस्ट्रेलियात आणीबाणी 

कॅनबरा

 ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात आगीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱयावरील जंगलांमध्ये लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक घरे जळून खाक झाल्यावर ही घोषणा झाली आहे.

आणीबाणी लागू झाल्याने परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. न्यू साउथ वेल्समध्ये जोरदार वाऱयांमुळे आग फैलावली आहे.

सर्वात धोकादायक आग

आतापर्यंतची सर्वात धोकादायक आग ठरू शकणाऱया आपत्तीला स्थानिक रहिवासी तोंड देत असल्याचे विधान न्यू साउथ वेल्सचे आपत्कालीन सेवा मंत्री डेव्हिड इलियट यांनी केले आहे. मागील 3 दिवसांमध्ये स्थिती धोक्याच्या पातळीवर पोहोचली असून प्रचंड नुकसान झाले आहे. मंगळवारपर्यंत आगीचे संकट अधिक उग्र होण्याची भीती आहे. आगीचा फैलाव देशातील सर्वात मोठे शहर असलेल्या सिडनीपर्यंत होऊ शकतो असे अधिकाऱयांनी सांगितले आहे.

Related posts: