प्रतिनिधी / पणजी
भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) काही तांत्रिक बिघाडामुळे 108 हा क्रमांक बंद पडला असून रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी तो क्रमांक चालत नसल्याचे कळविण्यात आले आहे. लोकांनी त्याऐवजी 0832-6656969 या फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बीएसएनएलची फायबर केबल तुटल्याने समस्या निर्माण झाली असून लोकांची 108 रुग्णवाहिका सेवेसाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्या क्रमांकाऐवजी उपरोक्त क्रमांक आरोग्य खात्यातर्फे जारी करण्यात आला आहे.