प्रतिनिधी /बेळगाव
बसवेश्वर चौक ते तिसरा रेल्वे गेट आणि जुनेबेळगाव नाका ते रूपाली थिएटरपर्यंतच्या जुना धारवाड रोड रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकरीता राज्यमार्ग विकास अनुदानातून 19 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रूपाली थिएटर ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने दुरवस्था झाली आहे. तसेच या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे वाहनधारकांना जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.
मात्र 24 तास पाणी योजनेंतर्गत रस्त्यावर जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात येणार होते. त्यामुळे या कामाची सुरुवात केली नव्हती. जुनेबेळगाव नाका ते रूपाली थिएटरपर्यंतच्या जुन्या धारवाड रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. संगोळ्ळी रायण्णा चौक ते रूपाली थिएटरपर्यंच्या जुन्या धारवाड रोडचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे.
पण पुढील रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट रोड बनविण्यात आले आहेत. पण बसवेश्वर चौक ते तिसऱया रेल्वे गेटपर्यंतच्या खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे बसवेश्वर चौक ते तिसऱया रेल्वे गेटपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. खानापूर रोड आणि जुना धारवाड रोडवरच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य मार्ग विकास अनुदानातून 20 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
या दोन्ही रस्त्याचे काँक्रिटीकरण लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यामुळे शहरांतर्गत येणारे दोन्ही रस्ते स्मार्ट बनणार आहेत. याकरिता या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्याची शक्मयता आहे.