वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वन प्लस कंपनीने आपला नवा वन प्लस 11 5जी ‘मार्बल ओडीसी’ स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा स्मार्टफोन आता 6 जूनला भारतात लाँच होणार असल्याची माहिती आहे.
चीनी कंपनीचा हा स्मार्टफोन थ्रीडी मायक्रो क्रिस्टलिंग रॉक मटेरियलसह सादर करण्यात आला आहे. 6 जूनपासून दुपारी 12 नंतर सदरचा नवा मार्बल ओडीसी स्मार्टफोन विक्री करीता उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. या आधी मार्चमध्ये चीनमध्ये वन प्लसने जुपीटर रॉक आवृत्तीच्या स्मार्टफोनची घोषणा केली होती. सदरच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 64 हजार रुपये असणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये हा स्मार्टफोन अव्वल ठरणार आहे.
ट्रिपल कॅमेऱ्यासह इतर सुविधा
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चीपसेटसह सदरचा फोन येणार असून 6.7 इंचाची अमोलेड 2 के स्क्रिन याला असणार आहे. ट्रिपल कॅमेऱ्याची सोय या फोनमध्ये असून एक कॅमेरा 50 मेगापिक्सल, दुसरा 32 मेगापिक्सलचा असेल.