प्रतिनिधी / ओरोस: गैरकायदा बिगरपरवाना दारू वाहतूक प्रकरणी दोषी धरून हुमरमळा वरचीवाडी येथील गुरुदास मिलिंद पराडकर २३ याला अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांनी ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पंचवीस हजार रुपये दंड ठोठवण्यात आलाय.सरकार पक्षाच्या वतीने ADV नितीन कुंटे यांनी काम पाहिले.
१७ मे २०२० रोजी रात्री ११ वाजता पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. मुंबई गोवा महा मार्गावर हुमरमळा येथे
स्कूटर वरून गोवा बनावटीची बिगर परवाना दारू वाहतूक करताना तो पकडला गेला होता.