प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी पेंटिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी या शिबिराला सुरुवात झाली असून सहा दिवस हे शिबिर चालणार आहे.
कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराला चालना देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सुनील पुजार, लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते. रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात प्रशिक्षण घेणाऱया कैद्यांना आयोजक एशियन पेंट्सकडून प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. यावेळी प्रशिक्षक नरेंद्रकुमार, विशालकुमार, सुपरवायझर विनायक, रोहीत आदी उपस्थित होते. शशिकांत यादगुडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
यावेळी बोलताना मुख्य अधीक्षक कृष्णकुमार म्हणाले, रंगकामाला आज मागणी आहे. रंगकामाचे प्रशिक्षण घेणाऱया कैद्यांना कारागृहातून सुटका झाल्यानंतर उद्योग-व्यवसाय चालविण्यासाठी अनुकूल ठरणार आहे. दुसऱयांदा हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. मार्चमध्ये 50 कैद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे अशी वेगवेगळी शिबिरे भरवून कैद्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.