वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेत पाक क्रिकेट संघाने विजयी सलामी देताना बांगलादेशचा 21 धावांनी पराभव केला. पाक संघातील सलामीचा फलंदाज तसेच या सामन्यात नाबाद अर्धशतक (78) झळकवणाऱया मोहम्मद रिझवानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 5 बाद 167 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 146 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना या सामन्यात हार पत्करावी लागली.
पाकच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने 50 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 78 धावा झोडपल्या. त्याने कर्णधार बाबर आझमसमवेत 7.1 षटकात 52 धावांची भागीदारी केली. बाबर आझमने 25 चेंडूत 4 चौकारांसह 22 तसेच तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला शान मसूदने 22 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. रिझवान आणि मसूद यांनी दुसऱया गडय़ासाठी 42 धावांची भर घातली. हैदर अली 6 तर इफ्तिकार अहमद 2 चौकारांसह 13 तसेच असिफ अली 4 धावांवर बाद झाले. मोहम्मद नवाजने 1 षटकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. पाकच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे तस्कीन अहमदने 25 धावात 2 तर हसन मेहमूद व मेहदी हसन मिराज, नेसूम अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात यासीर अलीने एकाकी लढत देत 21 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 42 धावा झळकविल्या. मेहदी हसन मिराजने 11 चेंडूत 1 षटकारासह 10, शब्बीर रेहमानने 18 चेंडूत 1 चौकारासह 14, लिटॉन दासने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35, अफिफ हुसेनने 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 25, कर्णधार नुरुल हसनने 1 चौकारासह 8 धावा जमविल्या. लिटॉन दास आणि अफिफ हुसेन यांनी तिसऱया गडय़ासाठी 50 धावांची भर घातली. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद वासीम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 24 धावात 3, मोहम्मद नवाजने 25 धावात 2, हॅरिस रौफने 38 धावात 1, शदाब खानने 30 धावात 1 तर शहनवाज दहानी 24 धावात 1 गडी बाद केला. संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकात 5 बाद 167 (मोहम्मद रिझवान नाबाद 78, बाबर आझम 22, शान मसूद 31, इफ्तिकार अहमद 13, तस्कीन अहमद 2-25, हसन मेहमूद, नेसूम अहमद आणि मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 20 षटकात 8 बाद 146 (मेहदी हसन मिराज 10, शब्बीर रेहमान 14, लिटॉन दास 35, अफिफ हुसेन 25, यासीर अली नाबाद 42, मोहम्मद वासीम 3-24, मोहम्मद नवाज 2-25, दहानी, रौफ आणि शदाब खान प्रत्येकी 1 बळी).