मोरजी /प्रतिनिधी
पार्से आणि आगरवाडा दरम्यान त्रैवार्षिक साजरी होणाऱया देवाची पुनव अंतर्गत रविवारी पहाटे श्री देवी भगवतीचे तरंगा सहित आगरवाडा येथे आगमन झाले.भाविकांनी रात्रभर जागून उत्साही वातावरणात जल्लोषी स्वागत केले.ढोल ताशांच्या गजरात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आगरवाडा पार्से परिसर गजबजून गेला होता. आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा रथ यावषी आकर्षण ठरला.यावेळी मंडळा तर्फे भाविका साठी चहा पानाची व्यवस्था करण्यात आली होती त्यासाठी मंडळाच्या महिला विभागाने जबाबदारी सांभाळली.
शनिवारी 12 वाजता च्या सुमारास पार्से येथील श्री भगवती मंदिराकडून निघालेली ही तरंगे पहाटे आगरवाडा येथे पोचताच भाविकांनी जल्लोषी वातावरणात स्वागत केले.
विशिष्टय़ रीतीने सजवलेली ही पारंपरिक तरंगे वाजत गाजत पार्से हून आगरवाडा येताना एका विशिष्ट लईच्या ठेक्मयावर पद न्यास करित ज्यावेळी आगरवाडा येथे येण्यास निघाली त्यावेळी भाविक भक्तांनी एक च गर्दी होती होती. या उत्सवाची गेल्या 4 दिवसापासून जय्यत तयारि चालू होती आगरवाडा पार्से दरम्यान रस्ता स्वच्छ केला होता.सडा रांगोळीने सजवला होता. रात्रभर जागरण करीत महिलांनी आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. रस्त्यात ठीक ठिकाणी कमानी उभारल्या होत्या.त्यावर विध्य?त रोषणाई केली होती. रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक सजावट केली होती.
पहाटे देवी भगवतीचे आगरवाडा सीमेवर आगमन झाल्या नंतर भव्य स्वागत झाले. रविवारी सकाळी ” हर हर महादेव च्या गजरात श्री सातेरी मंदिरात ही तरंगे आली असता त्या ठिकाणी आवश्यक पारंपरिक विधी पार पडले.
यावेळी देवी भगवतीचे सर्व महाजन ,पदा धिकारी,मानकरी सेवेकरी यांचे पारंपरिक रित्या स्वागत झाले.श्री देवी भागवतीचा कलश आणि तरंगे श्री सातेरी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती त्याठिकाणी भाविकांनी दर्शन घेतले.सुवासिनींनी खणा नारळानी ओटी भरून देवीचे दर्शन घेतले
पार्से तील भाविक भक्त देवीचे मानकरी या उत्सवात मोठया संख्येने सहभागी झाले होते. कांबळी,च्यारी ( मेस्त) मानकरी यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात होता. दिवसभर विविध धार्मिक विधी झाले.
सायंकाळी कौलाचो कुंनगो या पारंपरीक् जागेत सर्वासाठी कौल दिल्यानंतर ही तरंगे पार्से येथे जाण्यास माघारी फिरली.सोमवारी सकाळी श्री भगवती मंदिर पार्से येथे सामुहिक कौलाने उत्सवाची सांगता होईल.