ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या या माहितीनंतर आयोध्येतील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
‘जैश’चे दहशतवादी नेपाळमार्गे भारतात हल्ला करण्याचा कट रचत आहेत. आत्मघातकी बॉम्बच्या माध्यमातून येत्या २६ जानेवारीला अयोध्येसह दिल्ली आणि पंजाबमध्येही हे दहशतवादी बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.