राधानगरी,प्रतिनिधी
Kolhapur News : राधानगरीत मोठे शैक्षणिक संकुल आणि विद्यापीठ झाले नसल्याची खंत बाळगण्याची गरज नाही, राधानगरी येथील जेनिसिस इन्स्टिट्यूटची विद्यापीठाकडे वाटचाल सुरू असल्याचा विश्वास आमदार प्रकाश आबीटकर यांनी व्यक्त केला. ते जेनेसीस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा व संशोधन प्रयोगशाळा उद्धघाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती हे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष व गोकुळ संचालक अभिजित तायशेटे यांनी केले.
यावेळी युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी स्पर्धात्मक आणि संगणकाचे युग आहे.संस्था स्थापन आणि ती यशस्वीपणे चालवणं अवघड असते. जग प्रगतीपथावर असले तरी आरोग्याच्या सुविधा कमी पडत आहेत. शैक्षणिक गरज ओळखून जेनिसिस इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असणारे अभ्यासक्रम उज्वल भविष्याची नांदी असल्याचा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी शिष्यवृत्तीत राज्यात प्रथम असणारा तालुका सोयीसुविधा नसल्याने तालुक्यातील विद्यार्थी मागे राहतोय यामुळे उच्च आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वक्रतुंड एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ शोभराज माळवी यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला.यावेळी विविध क्षेत्रात निवड झालेल्या विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच फेजीवडे, दाजीपूर,हसणे व ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी अरुण जाधव,बशीर राऊत,दादासो सांगावकर,दीपक शेट्टी,फेजीवडे सरपंच फारुख नाळवेकर,कुडूत्रीचे सरपंच शिवाजी चौगले,बशीर राऊत,विलास डवर ,दिपक शेट्टी,तानाजी चौगले,सुरेश बचाटे,संजय माळकर,कुणाल मंडलिक, विजय बलुगडे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. आभार संस्थेचे प्राचार्य शोभराज माळवी यांनी मानले