संविधान समर्थक कृती समितीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारचा धार्मिक कार्यक्रम करण्यास मनाई करावी, अशी मागणी संविधान समर्थक कृती समितीने केली आहे. या संदर्भातील निवेदन समितीच्या सतीश्चंद्र कांबळे, सीमा पाटील, अनिल चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना गुरूवारी दिले. आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे. संविधानाच्या 51 कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोन जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही शासकीय इमारतीमध्ये धार्मिक कार्यक्रम करता येत नाहीत. संविधानाने आपल्याला धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे पण ते सार्वजनिक ठिकाणी नव्हे, आपापल्या घरी, चार भिंतीच्या आत, असे निवेदनात म्हटले असून धार्मिक कार्यक्रम रद्द करून राष्ट्रीय कार्यक्रम शासकीय कार्यालयात घ्यावेत ही विनंती.