दिल्ली : प्रतिनिधी
Prof. Sahitya Akademi Award given to Praveen Bandekar
साहित्य अकादमीतर्फे २०२२ चा मराठी भाषेतील साहित्यकृतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांना शनिवारी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशभरातील एकूण २४ भाषा प्रकरातील साहित्यिकांना यावेळी गौरविण्यात आले. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. साहित्य अकादमीचे नवीन अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा कुमुद शर्मा, सचिव के. श्रीनिवास राव, प्रख्यात इंग्रजी लेखक उपमन्यु चॅटर्जी आदी उपस्थित होते. बांदेकर यांच्या चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियायां ऍनिमल फार्म या कादंबरी प्रसिद्ध आहेत. याशिवाय येरु म्हणे, खेळखंडोबाच्या नावाने, चीनभिन हे कवितांग्रह तर घुंगुरकाठी हा ललित संग्रह प्रसिद्ध आहे. कोकणातील सर्व लिहित्या हाताना आपण हा पुरस्कार अपर्ण करत असल्याचे प्रा. बांदेकर यांनी पुरस्कार वितरणानंतर सांगितले.