कसबा बीड प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ, शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कसबा बीड पंचक्रोशीत बंद पाळण्यात आला. बीडशेड येथे झालेल्या निषेध सभेत मराठा महासंघ व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शासनाचा निषेध व्यक्त केला.
जालना येथील झालेल्या घटने संदर्भात करवीर तालुक्यात चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. सकल मराठा समाज कसबा बीड पंचक्रोशीच्या वतीने आज सकाळी 8.30 वाजल्यापासूनच भागातील विविध पदाधिकारी मराठा महासंघाचे कार्यकर्ते यांनी सर्व व्यापारी वर्गांना आवाहन करून सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ही निषेध सभा घेण्यात आली. यावेळी बीडशेड येथील सर्व व्यापारी वर्गाने सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग घेतला.
या निषेधाच्या पार्श्वभूमीवर बीडशेड येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेद्र सुर्यवंशी, डी. एम सुर्यवंशी, पंढरीनाथ माने, दादासो देसाई, शिवाजी लोंढे, धनंजय खाडे, मुकूंद पाटील, मच्छिंद्र कांबळे, नंदकुमार पाटील, हिंदूराव तिबिले, राजेद्र सुर्यवंशी, बुद्धीराज पाटील, चेतन नरके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनीच मनोगतामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजावर अन्याय होत राहिल्यास या पेक्षाही अधिक तीव्र लढा केला जाईल. जालन्यातील घटनेला राज्य सरकारच जबाबदार आहे, सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा. लाठीहल्ल्याचा आदेश कोणी दिला याचाही शोध घ्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यसरकारवर निशाणा साधला. यावेळी बीडशेड येथील सर्व व्यापारी वर्गाने सर्व व्यवहार बंद ठेवून सहभाग घेतला.
या निषेध सभेप्रसंगी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, मराठा महासंघाचे समन्वयक शिवाजी लोंढे ,कसबा बीड गावचे सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव तिबिले, डी एम सुर्यवंशी, कोगे गावचे ग्रामपंचायत सदस्य करण पाटील, लाल बावटा कामगार संघटनेचे मच्छिंद्र कांबळे,सावर्डे दुमालाचे पी एस मोहिते ,भगवान जाधव , एकनाथ खाडे, सागर सुर्वे , पोलीस पाटील पंढरीनाथ पंचक्रोशीतील पदाधिकारी, युवकवर्ग ,सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलीस उपनिरीक्षक निवास पवार, हवलदार प्रशांत पाटील,राहुल देसाई ,होमगार्ड नलवडे व साबळे आदी बंदोबस्तासाठी तैनात होते .