‘तरुण भारत संवाद’च्या विशेषांकाचे प्रकाशन
मालवण -:
समुद्रकिनारी भरणारा मालवण शहरातील एक मोठा जत्रोत्सव अशी ओळख असलेल्या दांडी येथील श्री दांडेश्वर देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ‘तरुण भारत संवाद’ने प्रकाशित केलेल्या जत्रोत्सव विशेषांकाचे दांडी ग्रामस्थांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.