प्रतिनिधी / बेळगाव : बेळगावच्या केंद्रीय बसस्थानकावर इतर भाषेसोबत मराठी भाषेत सुद्धा मुख्य फलक आणि इतर सूचना फलक बसवावेत. यासाठी NWKSRTC बसस्थानक व्यवस्थापकांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11.15 वाजता आर.टी.ओ. सर्कल जवळील कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.