सीपीएड मैदानावर दुपारी जाहीर सभा
बेळगाव : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवार दि. 20 मार्च रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. येथील सीपीएड मैदानावर दुपारी जाहीर सभेत ते भाग घेणार असून यावेळी राज्यातील पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता विशेष विमानाने ते दिल्लीहून बेळगावला निघणार आहेत. 12.30 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून दुपारी 1 वाजता सीपीएड मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेत ते भाग घेणार आहेत. 4.30 वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा आटोपून ते सांबरा विमानतळावर पोहोचणार आहेत. 5.15 वाजता विशेष विमानाने ते कन्नूरला (केरळ) जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सीपीएडवर भव्य शामियाना उभारला आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदी नेत्यांनी सीपीएड मैदानाला भेट देऊन तयारीची पाहणी केली.