बेळगाव : उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रात्री काकर मोहल्ला ते काकतीवेस परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजू सेठ यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रचारफेरीवेळी राजू सेठ यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. राजू सेठ यांच्या प्रचारफेरीदरम्यान माजी आमदार फिरोज सेठ यांनी नागरिकांशी संवाद साधून विकासकामे करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. यापुढेदेखील हाच अजेंडा घेऊन निवडणूक लढवित आहेत. मतदारसंघाचा विकास आणि नागरिकांचे हित जोपासण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विकास करण्यासाठी काँग्रेसकडून विविध प्रकारचा अजेंडा तयार करण्यात आला आहे. हा अजेंडा प्राधान्याने राबविला जाईल, असे काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. नगरसेवक सोहेल संगोळी यांनी उपस्थितांचे स्वागत करून राजू सेठ यांना बहुमोल मत देऊन निवडून देण्यात यावे, असे आवाहन केले. याप्रसंगी परिसरातील रहिवासी व काँग्रेसचे समर्थक मोठ्या संख्येने प्रचारफेरीत सहभागी झाले होते.
Previous Articleकोट्यावधीची जलजीवन योजना कुचकामी
Next Article अमर येळ्ळूरकर यांची कॅम्प परिसरात प्रचारफेरी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.