प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये मंगळवार दि. 31 मे रोजी तंबाखू प्रतिबंधक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष, माजी प्राचार्य एस. वाय. प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर रॅलीत शाळेतील पर्यावरण मंडळ, एन.सी.सी. आणि इन्ट्रक्ट क्लबच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी शिक्षक सुरेश भातकांडे यांनी रॅलीचा उद्देश स्पष्ट केला. एस. वाय. प्रभू व रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी यावेळी विचार व्यक्त केले. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी एस. एन. गावडे, एस. जी. बाळेकुंद्री, शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.