मेष
सध्याच्या वातावरणामध्ये तुमच्या पाठीमागे बोलणारे लोक जास्त झाले आहेत. हितशत्रू किंवा गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध ज्या कारवाया करत आहेत त्यांना आवरणे गरजेचे आहे आणि अशा वेळेला कठोर भूमिका घेणे तुम्हाला भाग पडेल. आपले कोण आणि परके कोण याची समज देणारा हा आठवडा असेल. संपूर्ण विश्वास ठेवावा असा काळ नाही.
धार्मिक स्थळाजवळील झाडाला पाणी घालावे
वृषभ
काही कारणामुळे सध्या तुमची मनःस्थिती बिघडू शकते .कोणत्यातरी बाबतीमधील कमतरता किंवा अभाव तुम्हाला सतावू शकतो. ही कमतरता केवळ पैशांच्या बाबतीमध्ये असेल असे नाही. नातेसंबंधातसुद्धा एक प्रकारचा विचित्र तणाव जाणवू शकतो. वैवाहिक जोडीदाराला परिस्थितीचे चटके जास्त बसू शकतात. या आठवडय़ात अनेक कामे एका वेळेला करावी लागतील आणि कोणाकडून कुठले काम करून घ्यावे हे तुम्ही योग्यरीतीने जाणू शकाल.
कुत्र्यांना बिस्किट घालावे
मिथुन
जे काम हातात घ्याल ते पूर्ण करण्याकरिता योग्य माणसांची निवड करणे गरजेचे ठरेल. या आठवडय़ात तशी माणसे तुम्हाला भेटतील. पैशांच्याबाबतीत सुसंधी प्राप्त होतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांच्या फसवणुकीला बळी पडू नये. आपल्या कामाकडे पूर्ण लक्ष द्यावे. मुंग्यांना साखर घालावी
कर्क
संधी समोर येत आहेत याचा फायदा लगेच उचलावा. नंतर करू नंतर बघू म्हणून हातातील संधी सोडू नयेत. कुटुंब सुख चांगले मिळेल. आर्थिक प्रगती मनासारखी होईल. कामाला उशीर झाला तरी चिडून न जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावे. आपली इच्छा इतरांवर लादू नये. प्रकृतीला सांभाळावे लागेल.
दिव्यांगाना आर्थिक मदत करावी
सिंह
जो वेळ तुमच्याकडे आहे त्याचा उपयोग करा. तुमच्यातील आतल्या आवाजाकडे लक्ष द्या. हा आवाज आपण दडपून टाकला असेल तर लक्षात येण्यासाठी थोडा वेळ जाईल. आपल्या अडचणीच्या वेळी हा आवाज आपल्याला खूप मदत करतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या शक्तीचा फायदा घ्या. या आठवडय़ात तुमच्या ज्ञानात, विद्वत्तेत वाढ होईल आणि हे ज्ञान भविष्यात फायदेशीर ठरेल.
अंध व्यक्तींना आर्थिक मदत करावी
कन्या
चांगले आणि वाईट याचे योग्य ज्ञान असलेली व्यक्ती तुम्हाला सल्ला देईल ज्या योगे तुमच्या कामामध्ये यश मिळेल. एखाद्या स्त्रीचा मौलिक सल्ला फायदा देऊ शकतो. या आठवडय़ात मन उदार असेल. पैशांची आवक उत्तम असेल. काही कारणाने सभोवतालचे वातावरण बिघडू शकते. अकारण तुमच्यावर अविश्वास दाखवला जाऊ शकतो.
नाग केशराचे दाणे जवळ ठेवावे
तूळ
तुम्ही असे काही काम बाजूला ठेवले असेल की जे नंतर केले तरी चालेल तर त्या कामावर तुम्ही आता आपले लक्ष केंद्रित करावे. ज्यामुळे काही नवीन यश संपादन करू शकाल. काही बदल संभवतात. नवीन घर किंवा करियरसंबंधात प्रगती होऊ शकते. कामाला उशीर झाला तरी चिडून न जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावे. चुका सुधारण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग करून घ्यावा.
पाच हळकुंड जवळ ठेवावेत
वृश्चिक
सध्याचा काळ तुम्ही समाधानाचे काही क्षण अनुभवत आहात. या आठवडय़ात आनंदाचे क्षण येतील. नातेसंबंध दृढ होतील. एखाद्या हुशार, प्रेमळ आणि बुद्धिमान स्त्रीमुळे फायदा होऊ शकतो. करियरमध्ये भरभराट होऊ शकते. तुमच्या कल्पनाशक्तीमुळे अवघड कामे सोपी होतील. या आठवडय़ात तुमच्या मनात चांगले भाव निर्माण होतील.
गरजूला आर्थिक मदत करावी.
धनु
परिवारातील मतभेदांमुळे किंवा सततच्या छोटय़ा-मोठय़ा कटकटीमुळे मन उदास राहण्याची शक्मयता आहे. याचा परिणाम तुमच्या कामावर होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांवर अवलंबून राहणे टाळावे. ऐकलेली बातमी खरी असेल अशा भ्रमात राहू नये. एखाद्या गोष्टीची संपूर्ण शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. या आठवडय़ात सावध राहण्याची अत्यंत गरज आहे. तुमच्या मनातील योजना उघड करू नयेत.
अशोकाचे पान जवळ ठेवावे
मकर
या आठवडय़ात काहीशा फसव्या आशा, गोंधळ आणि खोटय़ा कल्पना समोर येऊ शकतात. इतरांनी दिलेला चांगला सल्ला ऐकावा. मदतीचा हात स्वीकारावा. काही घडलेल्या घटनांमुळे तुमचे मन विचलित होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा जिथे अतिशय विश्वास टाकला आहे त्याच ठिकाणी घात होऊ शकतो. मन स्थिर ठेवून निर्णय घ्यावा.
गुलाबाचे अत्तर लावावे.
कुंभ
कोणतेही काम करताना दहादा विचार करून करावे. एखादे काम चुकू शकते. त्यातून मनःस्ताप होऊ शकतो. या आठवडय़ात स्वतःकरताही वेळ काढावा असे वाटेल. एखादा छंद जोपासावा ज्याने तणाव कमी होईल. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. नातेसंबंध विस्तारतील. कुटुंबाकरता खर्च कराल.
लहान मुलींना फणी भेट द्यावी.
मीन
तुमच्या अधिकार क्षेत्रातील काही गोष्टी दुसऱयांच्या हस्तक्षेपामुळे बिघडू शकतात. इतरांनी आपल्या कामात लक्ष देऊ नये असे तुम्हाला वाटेल. बऱयाच कामांना गती मिळेल. परिवारातील वातावरण चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर एखाद्या घटनेविषयी चर्चा कराल. प्रेमींनी भावनांचा अतिरेक होऊ नये याची काळजी घ्यावी.
जोडीदाराला लाल रंगाची फुले भेट द्या
टॅरो उपाय ः
एखादी व्यक्ती सतत आजारी असते, वारंवार दवाखान्याला जावे लागते, अन्न पचत नाही, रोगाचे निदान होत नाही अशा वेळी वैद्यकीय उपचारा सोबत हा उपाय करून पहा. त्या व्यक्तीने वापरलेल्या जुन्या सुती कपडय़ाच्या 2 वाती तयार करून तुपाच्या दिव्यात घाल्याव्यात. तो दिवा धार्मिक स्थळी लावावा. फ़रक पडेपर्यंत असे करावे