मेष
पैशांच्या बाबतीमध्ये काहीसे असमाधानकारक वातावरण असण्याची शक्मयता आहे. केलेल्या कष्टाचा मोबदला मनासारखा न मिळणे किंवा काही ठिकाणी पैसे अडकणे असे होऊ शकते. प्रॉपर्टीसंबंधी विवाद जोर धरू शकतात. प्रतिकारकारक शक्ती कमी झाल्याने संसर्गजन्य रोगाची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळेल.
उपाय: सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घाला
वृषभ
या काळामध्ये तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा बोलण्यामध्ये एक कमालीचे आकर्षण निर्माण होऊ शकते. नोकरदार वर्गाला याचा फायदा चांगला होईल. व्यावसायिकांना यातून चांगला नफा मिळण्याची शक्मयता आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. तीर्थयात्रेला किंवा लांबचा प्रवास करावा असे वाटू शकते. मानसन्मानाचे योग आहेत.
उपाय : गंगाजल जवळ ठेवा
मिथुन
अनामिक भीती किंवा टेन्शन वाढू शकते. मानसिक ताकद वाढवण्याची गरज आहे. अचानक घनलाभाचे योग होत आहेत. आध्यात्मिकविषयी ऊची वाढेल. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हाल. कामाच्या ठिकाणी कामांचा उरक वाढवण्याकडे कल असेल. एखाद्या समारंभामध्ये तुमचे कौतुक होईल.
उपाय : गाईला हिरवा चारा घाला
कर्क
स्वभावामध्ये रोमँटिकपणा येईल. लक्झरी आयटम्सकडे ओढ वाढेल. जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणावे असे जाणवेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर सुसंवाद घडेल. आनंद प्राप्ती होईल. जुनी एखादी चिंता सतावू शकते. कोणतेही कारण नसताना भीती वाटू शकते. एखाद्या तीर्थयात्रेला किंवा धार्मिक स्थळी कुटुंबीयांसोबत भेट द्याल.
उपाय : देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा
सिंह
या काळात तुमच्या स्वभावामध्ये उग्रता किंवा बेपर्वाई येऊ शकते ज्याने नुकसान होण्याची शक्मयता आहे. काही जुनाट रोग डोके वर काढू शकतात. नोकरदार वर्गाला चांगला काळ आहे. पण त्याचवेळेला गुप्तशत्रूंच्या कारवाया वाढतील. ऑफिसमधल्या राजकारणाने त्रस्त व्हाल. वैवाहिक जीवनामध्ये कटू घटना घडण्याची शक्मयता आहे.
उपाय : चार नारळ प्रवाहित करावे
कन्या
प्रेमप्रकरणांमध्ये यश मिळेल. मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांना आणि खेळाडूंना चांगल्या संधी प्राप्त होतील. या काळात तुमचे मन करमणूकप्रधान असेल. जीवनाचा आनंद घेण्याच्या प्रवृत्तीचा लाभ घ्याल. नोकरदार वर्गाला सगळ्या बाजूने सांभाळून राहण्याची गरज आहे.
उपाय : वाहत्या पाण्यात हिरवे मूग सोडावे
तूळ
प्रॉपर्टीसंबंधी व्यवहारांमध्ये एखाद्या स्त्रीच्या मदतीने कामे पूर्ण होण्याची शक्मयता आहे. या काळात चुकूनही शेअर बाजारासारख्या बेभरवशाच्या गुंतवणुकीमध्ये पैसा घालू नका. प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊन कटुता निर्माण होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात विचित्र घटना घडेल.
उपाय : तांदूळ दान द्यावे
वृश्चिक
भावंडांशी प्रॉपर्टीसंबंधी किंवा कागदोपत्री व्यवहारासंबंधी किंवा असलेल्या व्यवसायाविषयी बोलणी होतील. शेजाऱ्यांकडून मदत मिळण्याची शक्मयता आहे. या काळामध्ये व्यवसायामध्ये आणि वागण्यामध्ये आक्रमकता येऊ शकते. प्रॉपर्टीसंबंधी काही व्यवहार असल्यास पुढे ढकलावे. नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि त्यात फायदा होईल.
उपाय : लाल दोरा मनगटाला बांधावा
धनु
करायला जावे एक आणि व्हावे भलतेच असा काहीसा विचित्र योगायोग या काळात घडण्याची शक्मयता आहे. आर्थिक प्राप्तीकडे जास्त कल असेल. कुटुंबातील व्यक्तींकडे जास्त लक्ष द्याल. जवळच्या एखाद्या व्यक्तीकरता आर्थिक किंवा इतर प्रकारची मदत करावी लागू शकते. सोबत काम करणाऱ्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा.
उपाय : पक्ष्यांना दाणे घालावे
मकर
हा काळ आत्मसंतुष्टीचा असेल. तुम्हाला जे आवडते ते कराल. मन संवेदनशील होण्याची शक्मयता आहे. पण याचा फायदा दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. छोटा मोठा प्रवास घडू शकतो. पाण्याच्या ठिकाणी जाणारा असाल तर सावध राहा. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला आहे. छोट्या मोठ्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करावी
कुंभ
जाणते अजाणतेपणी खर्चाचे प्रमाण वाढत आहे. जे आवश्यक वाटतात त्याच गोष्टीकरता खर्च करावा. वायफळ खर्च केल्यास नंतर पश्चाताप होऊ शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. काही ठिकाणी निराशा हाती पडू शकते.
उपाय : वाहत्या पाण्यात पाच कवड्या सोडाव्या
मीन
अपेक्षा नसताना सगळ्या प्रकारचे लाभ होण्याची शक्मयता आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल. जुन्या आठवणी ताज्या होतील. विदेशी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर चांगला काळ आहे. आपल्या हातून चूक होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक ठरले. या काळात स्वभावामध्ये मधुरता येऊन रोमँटिक मूड असू शकतो.
उपाय : मुंग्यांना साखर घालावी