9 ते 15 जुलै
मेष
व्यापारी वर्ग मनासारखी कामे न झाल्याने थोडा अपसेट होऊ शकतो. नोकरीमध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याच प्रमाणामध्ये पगारवाढ किंवा प्रमोशनचेदेखील चान्सेस आहेत. विद्यार्थ्यांना केलेल्या अभ्यासाचे फळ मिळेल, पण लक्ष विचलित होऊ देऊ नका. समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवाल आणि त्यात यश मिळेल.
गोमती चक्र जवळ ठेवा
वृषभ
कोणाशीही बोलताना थोडा सावध पवित्रा घेतलेला बरा. बोलता बोलता एखादी न सांगता येण्यासारखी बातमी सांगून मोकळे झालात तर, नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. घरातील लोकांचा चांगला सपोर्ट मिळेल. एखाद्या समारंभाकरता किंवा फंक्शन करता पैसे खर्च करावे लागू शकतात. वयोवृद्ध लोकांनी आपल्या तब्येतीची चांगली काळजी घेणे गरजेचे असेल.
लवंग जवळ ठेवा
मिथुन
ऐकावे जनाचे करावे, मनाचे हा मंत्र या आठवड्यात फार उपयोगी पडेल. तुमच्या कामाच्या बाबतीत न विचारता दिलेला सल्ला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावा. योग्य धोरण ठेवले तर, प्रत्येक बाबतीमध्ये यश प्राप्त होण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. योगायोगाने घडलेल्या घटनेचा योग्य तो फायदा उचलाल.
निळा हात रुमाल जवळ ठेवा
कर्क
या आठवड्यात मन काहीसे नैराश्यपूर्ण असेल. कोणतेही काम करत असताना हवा असलेला जोम आणि उत्साह जाणवणार नाही. त्यात काही लोकांच्या बळजबरीमुळे जास्तीचे काम करावे लागेल. अडचणीच्या वेळेला एखाद्या मित्राची मदत कामी येईल. कुटुंबामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन निर्णय घ्याल.
दीपदान करा
सिंह
या आठवड्यात एखादा दैवी अनुभव घेण्याची शक्मयता आहे. अडचणीमध्ये सापडता सापडता वाचाल. धार्मिक गुऊची किंवा आध्यात्मिक एखाद्या व्यक्तीची मदत संभवते. जुने एखादे पुण्य कामाला येईल. वैवाहिक जीवनामध्ये थोडी कटुता येण्याची शक्मयता आहे, अशावेळी शांतपणे एकमेकांचे म्हणणे ऐकून घेतले तर निभावून न्याल.
आंबट, गोड मिठाई वाटा
कन्या
या आठवड्यामध्ये प्रत्येक निर्णय अत्यंत आवश्यक ठरेल. पुढचा मागचा काहीही विचार न करता घेतलेला निर्णय नुकसानदायक ठरू शकतो. घरात पाहुण्यांचे आगमन संभवते. त्यांच्याकरता वेळ काढावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे दुसऱ्याने काम न केल्याने चिडचिड होण्याची शक्यता आहे. तब्येत सांभाळा.
तांदूळ दान द्या
तूळ
हा आठवडा प्रतीक्षेचा आहे असे दिसते. एखादी घटना घडण्याकरता किंवा एखाद्या माणसाकडून हवे ते मिळण्याकरता वाट बघावी लागेल. नोकरी करता प्रयत्न करणाऱ्यांना चांगले अनुभव येण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला वैद्यकीय मदतीकरता धावपळ करावी लागेल. आर्थिक अनुभव चांगले असतील.
धार्मिक स्थळी दुधाचे दान द्यावे
वृश्चिक
तब्येतीला जपायला हवे. घसा आणि श्वासनलिका यासंबंधी विकार त्रास देऊ शकतात. या आठवड्यात एखादा प्रसंग असा विचित्र घडेल की, ज्यामध्ये तुम्हाला नक्की कसे वागावे, हे कळणे अवघड दिसते, अशावेळी ज्येष्ठ माणसाचा सल्ला कामी येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची जबाबदारी स्वत:हून स्वीकारावी लागेल.
साखर दान द्यावी
धनु
संधी भरपूर आहेत, पण त्यामध्ये कोणत्या संधी तुम्हाला सूट होतील किंवा कोणत्या संधीतून फायदा होईल, याबद्दल साशंक असाल. हाताखालील काम करणाऱ्या माणसांकडून त्रास संभवतो. नोकरी करणाऱ्यांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्यामुळे दमछाक होण्याची शक्मयता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
गंगाजल घरी ठेवा
मकर
हा आठवडा तुम्हाला आनंदाची भेट देऊन जाईल. आपल्या कामाबद्दल सतर्क व्हाल. कामाचे नियोजन करताना कोणते काम अधिक करायला हवे, याची योग्य ती जाणीव तुम्हाला होईल, पण याचबरोबर कामाच्या ठिकाणी काही गोंधळ होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये उतार चढाव असतील. आर्थिक बाबतीमध्ये समाधान मिळेल.
तांब्याचे नाणे विहिरीत टाका
कुंभ
‘ज्ञानापेक्षा अनुभव श्रेष्ठ’ याची प्रचिती तुम्हाला येण्याची शक्मयता आहे. पूर्वीच्या अनुभवामुळे परत ती चूक करण्याचे टाळाल. मित्र परिवारासोबत पार्टीला जाऊ शकता. एकंदर या आठवड्यामध्ये चैनीकरता खर्च होण्याची शक्मयता जास्त आहे. घरातील सदस्य पुरेसा वेळ न दिल्यामुळे चिडचिड करतील. किमती वस्तू सांभाळा.
चांदीचा तुकडा जवळ ठेवा
मीन
तुमच्या बरोबर काम करणाऱ्या आणि जवळच्या वाटणाऱ्या लोकांचे खरे स्वरूप तुम्हाला या आठवड्यामध्ये कळण्याची शक्मयता आहे. अशावेळी स्वत:चा स्वार्थ साधण्यामध्येच फायदा आहे. कोणालाही कुठलेही वचन देण्यापूर्वी दहादा विचार करा. आर्थिक बाबतीमध्ये कोणतीही कमिटमेंट करू नका.
अशोकाच्या पानावर श्री लिहून जवळ ठेवा
लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा वारंवार दृष्ट लागत असेल, काही आनंद साजरा केला की लगेच काहीतरी दु:खद घडत असेल, अशावेळी तिन्हीसांजेला थोडे मीठ, देठाची लाल मिरची, थोडी मोहरी, केरसुणीचा लहान तुकडा (खालील) हे एकत्र मुठीत घेऊन व्यक्ती वरून सात वेळा वरून खाली उतरून प्रार्थना करत विस्तवावर टाका.