रायगड. प्रतिनिधी
मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने महाडमध्ये ( जि.रायगड ) सहा वर्षाची लहान मुलगी गंभीरित्या भाजून जखमी झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई ते दाखल करण्यात आले आहे.
अनिता दिनेश वाघमारे वय ६ असे या लहान मुलीचे नाव आहे. रविवारी दुपारी ती मोबाईल जवळ खेळत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला आणि या स्फोटात अनिता वाघमारे या मुलगीचा चेहरा हात व अन्य ठिकाणी भाजल्याने जखमा झाल्या आहेत. या अपघातामध्ये अनिता सुमारे २० ते २२ टक्के भाजली असल्याचे सांगण्यात आले. या जखमा गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये तातडीने हलविण्यात आलेले आहे.