25 ते 36 रुपयांनी स्वस्त ः घरगुती सिलिंडरचा दर जैसे थे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नवरात्रीमध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. तथापि, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 25.50 रुपये, कोलकाता 36.50 रुपये, मुंबई 32.50 रुपये, चेन्नईमध्ये 35.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. मात्र, 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच म्हणजे साधारणपणे 1,050 ते 1,100 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.
नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. सुधारित दरांनुसार आता मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर 1,811.50 रुपये किमतीला मिळेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर 25.50 रुपयांनी कमी झाल्याने 1859.50 रुपये किमतीला असेल. कोलकातामध्ये हा दर 1959 रुपये तर चेन्नईमध्ये 2009 रुपये झाला आहे. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 2,354 रुपयांपर्यंत पोहोचले होते.
नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्मयांनी वाढ
जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्मयता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱया गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट होता.
6