प्रतिनिधी /बेळगाव
मृत्युंजयनगर-अनगोळ येथील रस्त्याशेजारी डेनेज चेंबर गेल्या आठ दिवसांपासून उघडय़ावर आहे. डेनेज चेंबर खचल्याने त्याठिकाणी नवीन ड्रेनेज चेंबरची बांधणी करण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याची बांधणीच करण्यात आली नाही. त्यामुळे तो खड्डा उघडय़ावर आहे. तेव्हा दुर्घटना घडण्यापूर्वी त्याची बांधणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
डेनेज चेंबरसाठी खोदाई करण्यात आलेला हा खड्डा दोन रस्त्याच्या वळणावर आहे. त्यामुळे हा खड्डा मोठा धोकादायक ठरला आहे. बांधकामाचे साहित्यही आणून ठेवण्यात आले आहे. मात्र अद्याप त्याचे कामच सुरू करण्यात आले नाही. डेनेजच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. याचबरोबर रात्रीच्यावेळी वाहने चालविणे धोक्मयाचे ठरत आहे. तेव्हा तातडीने याची बांधणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.