प्रतिनिधी /बेळगाव
गांजा विक्री करणाऱया तिघा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 1 किलो 45 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
अशोकनगरजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सर्फराज सजर मुल्ला (वय 35, रा. न्यू गांधीनगर), जाफर हुसेन सोल्लापूर (वय 24, रा. वड्डरवाडी), नरेश गौडा लोंढे (वय 48, रा. गँगवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला
आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार, लक्काप्पा जोडट्टी, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या जवळून 1 किलो 45 ग्रॅम गांजा, 500 रुपये रोख रक्कम, एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.