वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या कंबाईंड विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटीलने पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी सातवे स्थान पटकाविले.
18 वर्षीय रुद्रांक्षने कनिष्ठांच्या झालेल्या विश्व नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत रुद्रांक्ष पाटीलने 153.7 गुणांसह सातवे स्थान पटकाविले. या प्रकारात सर्बियाच्या कोव्हासेव्हिकने सुवर्णपदक, क्रोएशियाच्या मॅरेसिकने रौप्य आणि कझाकस्तानच्या युसेनोव्हने कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत 12 जणांचा भारतीय संघ सहभागी झाला आहे.