सुंदर आठवणींशी जोडून नकारात्मक भावनांवर करते मात
तणाव कमी करण्यास उपयुक्त
लोक सॅड म्युझिक का ऐकतात? आतापर्यंत सॅड म्युझिक आणखी दु:खी करत असल्याचे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात सॅड म्युझिक हे आम्हाला सुंदर आठवणींशी जोडण्यास मदत करते. आम्ही आमच्या खऱ्या जीवनात उदास होऊ इच्छित नाही, परंतु आम्ही संगीताद्वारे ती भावना जाणवू इच्छितो असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
लोकांच्या मेंदूत एकाचवेळी कुठल्याही गोष्टीसाठी दोन धारणा तयार होतात. यातील एक यथार्थवादी तर दुसरी आभासी असते. सॅड म्युझिक गाण्यांसोबतही हेच घडते. ही गाणी खोल दडलेल्या आठवणींमध्ये नेतात, परंतु उदास करत नाहीत असे संशोधक आणि येल युनिव्हर्सिटीचे मनोवैज्ञानिक डॉक्टर जोशुआ नोब यांनी म्हटले आहे.
हॅप्पी म्युझिक आनंदी करेलच असे नाही
डॉक्टर नोब आणि त्यांची विद्यार्थिनी तसेच कॉग्नेटिव्ह वेज्ञानिक तारा वेंकटेशन यांच्याकडून सॅड म्युझिकवर करण्यात आलेले हे सोंधन जर्नल ऑफ एस्थेटिक एज्युकेशनमध्ये प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी कुठलेही आनंदयुक्त गीत आनंदी करेल आणि उदासीपणाने युक्त गाणे उदास करेलच असे नाही असे नमूद केले आहे.
उदासपणाने युक्त गीत नकारात्मक भावनांमधून बाहेर पडण्यास मदत देखील करतात. ही गाणी श्रोत्यांना भावना व्यक्त करणे, तणाव कमी करण्यास मदत आणि एकटेपणाच्या स्थितीत साथ तसेच दिलासा देतात. उदासपणाने युक्त संगीत आम्हाला स्थितीची जाणीव होण्यास मदत करत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
आम्ही जे काही अनुभवतोय त्यात काहीच चुकीचे नसल्याची जाणीव दु:खयुक्त संगीतामुळे होते. मनाला भिडणारे संगीत आम्हाला येणारे अनुभव नैसर्गिक आणि मानवी स्वरुपाचे असल्याची जाणीव करून देतात. तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.
सॅड म्युझिक एक प्रकारचे आनंद सोबत घेऊन येते, जे दैनंदिन जीवनातील उदासपणाने युक्त भावनांप्रमाणे प्रत्यक्ष स्वरुपात नुकसान पोहोचवत नाही. याच्या उलट हे ऐकणाऱ्यांना उदासपणाने युक्त भावनेचा आनंद घेण्याची अनुमती देतेसे तसेच वास्तविक जोडलेपणाची जाणीव करविते असे स्वीडनच्या उप्साला युनिव्हर्सिटीतील संगीत मनोवैज्ञानिक पॅट्रिक जस्लिन यांनी म्हटले आहे.
दु:खाची स्थिती वाढण्यापासून रोखते
सॅड म्युझिक पसंत असण्यामागे वैज्ञानिक पैलू देखील आहेत. दु:ख, उदासपणा किंवा तणावाच्या स्थितीत सॅड म्युझिक प्रोलेक्टिन हार्मोन रिलिजला उत्प्रेरित करतात. तसेच स्वत:च्या दु:ख बाजूला सारण्याच्या प्रभावामुळे हे वेदना कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते असे डॉ. नॉब यांनी सांगितले. मानसिक दबावाच स्थितीत प्रोलेक्टिन दिलासा, स्थैर्याची भावना निर्माण करते. यामुळे दु:खाच्या स्थितीला मोठ्या प्रमाणात वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळते. संशोधनानुसार अनेक लोक केवळ भावनांनी युक्त सॅड म्युझिक ऐकतात आणि रडून स्वत:ला हलकं करतात.