प्रतिनिधी/ पणजी
जुने गोवेचे फेस्त प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व अग्निशामक दलातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. काल सकाळी अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत जवान व अधिकाऱयांना सूचना केल्या.
जुने गोवेच्या फेस्ताला देश-विदेशातील नागरिक उपस्थित लावतात. यंदा विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची खबरदारी म्हणून या ठिकाणी पोलिसांबरोबरच अग्निशामक दलाचे 79 जवान व 10 अधिकारी नेमण्यात आले आहेत. याशिवाय आगीसारखी घटना घडल्यास त्यावर नियंत्रण यावे म्हणून पाण्याचे तीन बंब ठेवण्यात आले असून, दहा ठिकाणी दलाचे पॉईंट असल्याची माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.