प्रतिनिधी /बेळगाव
सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातर्फे नाथ पै सर्कल, शहापूर येथील अंबाबाई मंदिरामध्ये सहस्त्रार्जुन जयंती साजरी करण्यात आली. सकाळी सहस्त्रार्जुन महाराजांचा जन्मदिवस साजरा करून आरती करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्वांना अल्पोपाहार देण्यात आला.
सायंकाळी सहस्त्रार्जुन महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये समाजातील बहुसंख्य नागरिकांनी भाग घेतला होता. मिरवणूक संपताच महाआरती होऊन सर्व समाज बांधव व भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी, तरुण मंडळ अध्यक्ष नितीन शालगर, आदीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा गीता कल्पवृक्ष व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.