मणेराजूरी / वार्ताहर
तासगाव तालुक्यातील गव्हाण या गावचे अमोल एकनाथ पवार ( वय ३०) या लष्करी जवानाचे सेवेत रुजू असताना अल्पशा आजाराने निधन झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
अमोल पवार हे सध्या लखनऊ येथे लष्करातील युनिट-५ पॅरा यामध्ये नाईकपदी कार्यरत होते. मंगळवारी अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघडली असता त्यांना उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये भरती केले; मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले.
गव्हाण गावची यात्रा दिनांक १६ मे ते २० मे अखेर असल्याने ते सुट्टीवर गावी येणार होते. त्यांनी काही दिवसापूर्वीच १२ तारखेला येणार घरी येणार असल्याचे फोनवरून कळवले होते. परंतु त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाचा घाला झाला. त्यांच्या पश्चात आई,वडील पत्नी अनुजा, मुलगी आरोही (वय -४), मुलगा अधिराज (वय२), दोन बहिणी असा परिवार आहे.गुरुवारी त्यांच्यावर गव्हाण( विठ्ठलनगर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.