पलूस/प्रतिनिधी
सुस्थितीत असणाऱ्या कुंडल प्रादेशिक योजनेकडून पलूस शहरासाठी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने पलूस नगररिषदेचे लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. याबाबत निवेदन देवून माहिती विचारली असता गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी उडावा उडवीची उत्तर दिल्याने गटनेते सुहास पुदाले व अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.
पलूस शहरासाठी कुंडल प्रादेशिक योजनेमधून पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवळा सुरळीत व्हावा यासाठी वारंवार मागणी होत असते. कुंडल प्रादेशिक च्या चूकीच खापर पलूस नगरपरिषदेवर फोडते जात आहे. पलूस नगरपरिषदेच्या मागणीनुसार सुमारे दहा तास पाणी पुरवठा होणे आवश्यक असताना पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून केळव सहा ते सात तास पाणी दिले जाते. परिणामी पलूस शहरातील नागरीकांना अपुरा पाणी पुरवठा होतो. ही बाब येथील लोकप – तिनिधींच्या लक्षात येताच गटनेते सुहास पुदाले, अॅड के. डी. कांबळे, संदीप सिसाळ, मिलिंद डाके, नितीन खारकाडे, अविनाश भोरे, रविंद्र माने यांनी पलूस पंचायत समितीत धाव घेतली. याबाबत पलूस शहरासाठी दहा तास पाणी सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी लोकप्रतिनिधींना उडवा उडवीची उत्तरे दिल्याने लोकप्रतिनिधी पाटील यांच्यात वादावादी झाली.